कृपा त्या पांडुरंगाची_Krupa tya pandurangachi

कृपा त्या पांडुरंगाची


हे अभंग अतिशय सुंदर अश्या स्वरूपात आणि गोड आवाजात गाणारे गीतकार व  संगीत श्री वैभव थोरवे आणि त्यांना उत्तम रित्या साथ देणार गायक  श्री महेश कंटे (आवाज महाराष्ट्राचा महाविजेता ) सुंदर स्वरूपात सादर केली आहे. 

लागलीसे आज मजला गोडी अभंगाची 
कृपा त्या पांडुरंगाची
ध्यानी मणी पांडुरंग राम कृष्ण हरी
ध्यानी मणी पांडुरंग राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी  जय जय राम कृष्ण हरी  ।। १ ।।

पुंडलिकासाठी आला विठेवरी
धन्य झाली चंद्रभागा
धन्य ती पंढरी धन्य ती पंढरी
तारिली ती अभंग गाथा संत तुकोबा ची   ।। २ ।।

नामदेवा संगे कीर्तनी रंगला
सावत्या संगे मला कशीला
नाथा घरी पाणी
अमर झाली ती दोहे संत कबीराची   ।। ३ ।।

ऐसी तुजी अघात लीला दाविली जगाला
सुख शांती दिली मनाला 
धन्य तुजी ख्याती
अखंडची घडते सेवा मज पामराची   ।। ४ ।।

या गवळणीची चाल समजून घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता 

👇🏻

Link 


आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||

    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे तसेच आपल्या भावी पिढीला यांचे अवलोकन करता यावे तसेच आपली संतांची भूमी आहे आणि ते मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. 

आपल्या कोकनात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो ' भक्तीरसातुन जनमाणसा नंतर नतमस्तक म्हणजे भजन 'भ - भजावा  ज - जपावा आणि न - नमावा म्हणजे  भजन होय. कोणतेही भजनी बुवा बारचे प्रतिस्पर्धक तरी संपुष्टात आणायचे ते चांगले मित्रांचे आदर करतात. आम्हाला खात्री आहे की हा लेख  मनोरंजन भजनानंद रचून मंत्रमुग्ध कारणी भजने आणि खजीना आसणारी डबलबारी भजने आपल्याला आनंद होईल. या बद्दल आम्हाला सुद्धा खूप आनंद होते कि तुम्ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणत प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला जर तुमची कोणती कविता किंवा गवळण नेट वर टाकायची असेल तर नक्की कंमेकॅन्ट मध्ये सांगू शकता. 

1 comment

Anonymous said...

very nice this abhang

Powered by Blogger.