लोकप्रिय कृष्णाच्या गौळणी lyrics
लोकप्रिय कृष्णाच्या गौळणी lyrics
।। १ ।।
अधरी धरुनी वेणु। वेणु वाजविला कोणी नेणुं । । १ ।।
प्रातःकाळी तो वनमाळी । वना घेऊनी जातो धेनु।। २ ।।
उभी मी राहें वाट मी पाहें। केव्हां भेटेल मम कान्हूं।। ३ ।
एका जनार्दनीं वाजविला वेणु। ऐकतां मन झालें तल्लीनुं । । ४ । ।
।। २ ।।
अनंत ब्रम्हांडें उदरीं । हरि हा बालक नंदाघरीं ।।१ ॥
नवल केव्हडें नवल केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें । । २ ।।
पृथ्वी जेणें तृप्त केली। त्यासी यशोदा भोजन घाली ।।३।।
विश्वव्यापक कमळापती। त्यासी गौळणी कडिये घेती ।।४।।
तुका म्हणे नटधारी। भोग भोगून म्हणे ब्रह्मचारी ।। ५ ।।
।। ३ ।।
धांव कान्होबा गेल्या गाई । न म्हणें मी कोणा काई । । १ । ।
आपुलियांचें वचन देवा । गोड सेवा करीतसे ।। २ ।।
मागतां आधीं द्यावा डाव । बळिया मी तो नाहीं भाव ।। ३ ।।
तुका म्हणे ऐशा सवें। अनुसरांवें जीवेंभावें ।।४।।
।। ४ ।।
मैं भुली घरजानी बाट । गोरस बेचन आयी हाट ।। १ ।।
कान्हा रे मनमोहन लाल । सबही बिसरूं देखें गोपाल ।। २ ।।
कहाँ पग डारुं देखे आनेंरा। देखें तो सब वोहिने घेरा।।३।।
हुं तो थकित भई रे तुका। भागा रे सब मन का धोका ।।४ ।।
।।
५ ।।
हरिनें माझे हरिले चित्त । भार वित्त विसरलें ।। १ ।।
आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ।।२।।
पारखियांसी सांगता गोष्टी। घरची कुटी खातील ।। ३ ।।
तुका म्हणे निवांत राही । पाहिले पाही परतोनी । । ४ । ।
।।
६ ।।
कोणी एकी भुलली नारी। विकिता गोरस घ्या म्हणें हरि ।। १ ।।
देखिला डोळां बैसला मनीं । तोचि वदनीं उच्चारी ।। २ ।।
आपुलियाचा विसर भोळा। गोविंद कळा कौतुकें ।। ३ ।।
तुका म्हणें हांसे जन। नाहीं कान तये ठायीं ।।४।।
।।
७ ।।
बरवा वो हरि बरवा वो। गोविंद गोपाळ गुण गरुवा वो।। धृ ।।
सावळां वो हरि सावळां वो। मदन मोहन कान्हू गोवळा वो।। १ ।।
पाहतां वो हरि पाहतां वो। ध्यान लागलें या चित्ता वो।। २ ।।
पढिये वो हरि पढिये वो। बापरखुमादेवीवरु घडिये वो।।३।।
।। ८ ।।
तुझ्या कृष्णाला, तुझ्या कान्हाला। भुलविले राधेने (गोपीनें) ।
यशोदे तुझा कान्हा राहिना। मी मारीन क्रोधाने ।।धृ।।
नंदाजी तुमचा कृष्ण हा लाडका। हाका मारीतो मोठ्याने।। १ ।।
वेताटी घेवूनी नावेत बैसला। वाचविलें देवानें ।। २ ।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेनें । नाही ऐकीलें मातेनें ।। ३ ।।
।। ९ ।।
गड्यांनो तुम्हीं गाई घेऊनी । सारे गोपाळ रानात या...।।धृ।।
दही भात काला गोपाळांनी केला । गाई गेल्यात वरल्या राना... ।। १ ।।
आली ढवळी आली कान्हा पवळी आली। आपण जाऊया यमुना तिरी..।।२।।
एका जनार्दनी विनवितो हरि । गाई गेल्यात कुंजवना...।। ३ ।।
।। १० ।।
धरूं नको हरि, यमुनेच्या तिरी। यमुनेच्या घाटावरी, कां रे देवा वाटेवरी।।धृ।
धुण्यासी जाता यमुनेवरती। कान्हा संगे करी बाई गुलगुल गोष्टी ।। १ ।।
नंदनंदना कंस कंदना । छळू नको रे हरि तूं गोविंदा । । २ । ।
एका जनार्दनी विनविते राधा। दह्या दूधाचा अमुचा हा धंदा ।। ३ ।।
।। ११ ।।
देहुडा चरणी वाजवितो वेणु। गोपिकारमणु स्वामि माझा । । १ । ।
देखिंलागे माये यमुनेचे तीरीं । हात खांद्यावरी राधिकेच्या ।। २ ।।
गुंजवर्ण डोळे शिरीं बाबर झोटी। मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे । । ३ । ।
सगुण मेघः श्याम लावण्य सुंदर। नामया दातार केशवराज । । ४ । ।
।। १२ ।।
जरा धीरे से बजाना। बंशी बजानेवालें। मुरली सुनानेवालें ।। धृ ।।
हाथों में लकड़ी कंधे कंबलिया । गैया चरानेवालें ... बंशी... ।। १ ।।
मोर मुकुट पितांबर शोभें। कालिया मर्दनवालें.. बंशी..।। २ ।।
मीरा कहें प्रभु गिरीधर नागर। पंढरी (गोकुल) में रहेनेवालें .. बंशी... । । ३ ।
।। १३ ।।
उभी ती अनयाची राधा । तिला कृष्ण मुरलीची बाधा ।। धृ ।।
स्वर मुरलीचा पडता कानी । बावरली ती गोकूळ हरीणी।
स्वरसौंवाऐं भान हरपूनी । विसरी घरधंदा, गा गा गा..।। १ ।।
नाद कोंदला साऱ्या त्रिभुवनी । धुंद झाली सारी अवनी।
हर्ष गळतसे नयनामधुनी। भूलली स्वरनादा, गा गा गा... ।। २ ।।
भुलविती गौळणी परस्पराला। वेड लागले या राधेला ।
एका जनार्दनी कन्हैया दमला। राधेच्या छंदाला, आ आ आ । । । ३ । ।
।। १४ ।।
लागला नामाचा छंद। ऐकोनी वेणूचा नाद.. ।।धृ।।
निघाली लगबग पाण्याला। रिकामा घेऊनिया डेरा।
गिरीधर गोविंद गोविंद.. ।। १ ।।
निघाली धेनू चाराया । वासरे करुनिया गोळा।
वाजवी पावा गोविंद ।। २ ।।
नामा म्हणे केशवराजा। नाम घ्या श्रीकृष्ण गोविंद।
गौळणी झाल्या मतिमंद ।। ३ ।।
।। १५ ।।
तुझी सांगाती नाही कामाची । मी सुंदरा कोवळ्या मनाची ।
मज दृष्टी होईल साची । घेईन तुझी चरया...
कसें वेड लाविलें कान्हा गोवळियां।।धृ।।
माझा वंश आहे मोठ्याचा । तूं तंव यातिहीन गवळ्याचा ।
ऐके झालिया नांवा रुपाचा । ठावची पुसलिया...।। १ ।।
तुझ्या अंगीची घुरट घाणी। तनुकाया दिसती वोंगळवाणी।
मुरली वाजविसी मंजुळवाणी । मनमोहना कन्हैया.... । । २ ॥
तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा। चोरी करुनी भरसी पोटा।
वज्रनारी सुंदरा चावटा। अडविसी अवगुणिया .... । । ३ । ।
सर्व सुखाची कृष्ण संगती । वेणूनादें गाई गोप वेधती ।
एका जनार्दनी हरिरुपी रमती । त्या वज्र सुंदरीया.... ।।४ । ।
।। जय जय रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।।
Post a Comment