गजर- श्री हरीची भजने

गजर

श्री हरीची भजने




।। ।।

टाळ घेऊ हाती विणा खांदयावरी।

विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ पंढरी, विठ्ठला-२-२... ।।


।। ।।

पिंपळाच्या पारी नामदेव । बसून किर्तन करी। 

सोनियाच्या तारा विणा । हरिच्या खांदयावरी...।।


।। ।।

विठ्ठलाला (विष्णूला) तुळशी। गणपतीला दुर्वा ।

 शंकराच्या पिंडीवरती बेल। शोभे हिरवा...।।


।। ।।

सत्यनारायणा । आलो तुझ्या दर्शना।

आलो तुझ्या दर्शना। पतित पावना। सत्यनारायणा...।।


।। ५ ।।

चंद्रभागेच्या तिरावरी। गजर होतो हरिनामाचा। 

सावळा माझा उभा विटेवरी । पुंडलिकाच्या प्रेमाचा।।


।। ६ ।।

निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई । एकनाथाच्या घरी। 

गोऱ्या कुंभाराच्या घरी देवाने। घडविल्या घागरी।।


।। ७ ।।

जय जय विठ्ठले। विठ्ठले विठ्ठले रखुमाई। सावळे विठ्ठले रखुमाई ।।


।। ।।

विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल । करुया गजर...।। 

तुकारामाचा विठ्ठल विठ्ठल । ज्ञानदेवाचा विठ्ठल... ।। 

चांगदेवाचा विठ्ठल विठ्ठल । सोपानदेवाचा विठ्ठल...।।

 मिराबाईचा विठ्ठल विठ्ठल । जनाबाईचा विठ्ठल... ।।

हरिदासाचा विठ्ठल विठ्ठल । जय दासाचा विठ्ठल विठ्ठल... ।।


।। ।।

संतरुपी एक नगर । पाहूं चला पंढरपूर-२ ।।

 पंढरपूर संतांचे माहेर। होतो हरिनामाचा गजर ।।

 पंढरीला जाऊं। डोळे भरुनी पाहूं।

पाहूया विठ्ठल सावळां । चला जाऊ पंढरीला... ।।


।। १० ।।

गजानना गजानना गणराया। मुखाने गाऊं या मोरयां । । 

फळे फुले वाहूया पुजन करुयां। लाडूमोदकांचा नैवेदय दावूयां । 

भक्ती भावाने गणेशाला पुजूयां, मुखाने.... ।। 

देव देवतांचा तू महाराजा। गुण किती गाऊं सदामुखी माझ्या । 

भक्ती भावाने गणेशाला वंदूया, मुखाने.... । ।


।। ११ ।।

गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। राधा रमण हरि गोपाल बोलो। 

जय नंदलाला जय जय गोपाळा। जय मनमोहन मुरलीवाला ।।

 हरिभजनी मोर नाचतो अंगणी । पायाकडे पाहूनी। 

पायाकडे पाहूनी नाचतो। पायाकडे पाहूनी, हरिभजनी ... ।।


।। १२ ।।

कुणी जाऊनिया सांगा । निरोप माझ्या विठोबाला ।। 

डोळ्याने आंधळा पायाने पांगळा । कैसा येऊ तुझ्या दर्शनाला... ।।

 आषाढी कार्तिकी एकादशीला। कैसा येऊ तुझ्या दर्शनाला... ।।


।। जय जय रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।।



 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||

No comments

Powered by Blogger.