जाऊ दे रे मला मथुरे ला_गवळण

 जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा


 जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।

निघूनी गेल्या गवळणी साऱ्या।
निघूनी गेल्या गवळणी साऱ्या मथुरेच्या बाजाराला।
मथुरेच्या बाजाराला
उशिरा झाला बाजाराला नंदलाला रे गोपाळा रे ||धृ ||

निघूनी गेल्या गवळणी थाट ।
कृष्णा अडवू नको आमची वाट।।
उशीर झाला बाजाराला ।
नंदलाला रे गोपाळा रे ।

जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा।।

एका जनार्दनीं गवळण राधा।
कृष्ण सख्या ची जडली बाधा।
उशीर झाला बाजाराला ।
नंदलाला रे गोपाळा रे ।

जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा।।


 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||

No comments

Powered by Blogger.