आकाशी झेप घे रे पाखरा
आकाशी झेप घे रे पाखरा
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा ||धृ||
तुज भवती वैभव माया,
फळ रसाळ मिळते खाया..२
हा कुठवर वेड्या घेssसी आसरा
सोडी सोन्याचा पिंजरा..२ ||१||
घर कसले ही तर कारा,
विषसमान मोती चारा..२
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा जैसा उंबरा
सोडी सोन्याचा पिंजरा..||२||
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने..२
दरी डोंगर हिरवी राने..२
जा ओलांडून या सरिता सागरा
सोडी सोन्याचा पिंजरा.. ||३||
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते..२
हृदयात व्यथा ही जळते,
का जीव बिचारा होई बावरा
सोडी सोन्याचा पिंजरा..||४||
घामातून मोती फुलले,
श्रमदेव घरी अवतरले..२
घर प्रसन्नतेने नटले..२
हा योग जीवनी आला साजिरा
सोडी सोन्याचा पिंजरा..२
आकाशी झेप घे रे पाखरा..२
सोडी सोन्याचा पिंजरा..२ ||५||
आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा
|| धन्यवाद ||
Post a Comment