बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनिया
आली उंदरावरुनी गणरायाची स्वारी
सज्ज झाली धरणी करण्या स्वागत भारी
गणपती बाप्पा आले घरा दिस सोन्याचा उगवला
तुला पाहण्या चातकापरी जीव माझा आतुरला
बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगूनीया ||धृ||
केली रंगरंगोटी घरा वाजे सूर सनई चौघडा
सुबक रांगोळीने बहरला भोवतालचा सडा
माटी मखर सजला फळा फुलांनी नटला
बहुप्रेमाने तुला आदरे आसनी बसवीला ||१||
मान पहिला तुझ्या पूजेचा हार कंठी नवरत्नांचा
दुर्वांकूर वाहील्या पदी बेत मोदक नैवेद्याचा
हे गणनाथा तू भाग्य विधाता
जमलाय सारा भजनी मेळा आरती करायला ||२||
दिड पाच सात नऊ अकरा सण होई तुझा साजरा
मांगल्याचा सुवास पसरे दाही दिशांना खरा
या विघ्न हराया तुम्ही गौरी तनया
गणपती बाप्पा मोरयाने परिसर दुमदुमला ||३||
👇🏻
1Link
2Link
आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा
|| धन्यवाद ||
Post a Comment