शिर्डी चे साई बाबा आणि पंढरीचा विट्टल आपण सगळेच जाणतो.
तसेच अतिशय सुंदर गायलेले आणि सर्वांना गोडी असलेले हे श्री साई बाबांचे भजन आपण पाहणार आहोत. हे भजन आपण आपल्या चाली नुसार गाऊ शकतो. कारण कि खूप रसिकांनी हे भजन वेगवेगळ्या स्वरूपात गाण्याचा प्रयत्न केला आहे.हे भजन आपण शांत स्वरूपात न घेता खूप स्वतःहून खूप जल्लोष मध्ये गाण्याचा प्रयत्न करावा. खाली पाहाल तर सुंदर चाल लावलेल्या भाज्यांच्या काही लिंक दिल्या आहेत. त्यांच्या साहाय्याने आपण या भजनाला चाल लावू शकता.
हे ये र बा साईबाबा, तू येर बा साईबाबा
ओव्या गाऊ कौतुकेतु येर बा साईबाबा ।। धृ ।।
विठ्ठलाला तुळस गणपतीला दुरवा ।
अन शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा ।। १ ।।
आई बाबाला तहान लागली बाळ गेलं पाण्याला ।
अन दशरथाने बाण मारला श्रावण बाळाला ।। २ ।।
चंद्रभागेला पूर आला पाणी लागले वडाला ।
अन रुक्मिणी म्हणे धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला ।। ३ ।।
प्रभुरामाचा शिष्य तू अंजलीच्या सुता ।
हनुमंता उघड छाती दाखव रामसीता ।। ४ ।।
वृदावनीं कृष्णाने वाजवली बासरी ।
अन कृष्णाला पाहुनी बया राधा झाली बावरी ।। ५ ।।
लावितो भस्म अंगाला शिवशंभो हा भोळा ।
अन नाग त्याने बैसविला गळा घालुनी वेटोळा ।। ६ ।।
शकुनीच्या कपताने पांडव सारा हरीवला ।
अन द्रवपती म्हणते धाव तु कृष्णा पदर माझा ओडीला ।। ७ ।।
भक्ती त्याची पाहूनी गेला साई धावुनी ।
अन पाई आणल चालुनीया साई सेवक वाल्यानी ।। ८ ।।
या गवळणीची चाल समजून घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता
👇🏻
Link
आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा
|| धन्यवाद ||
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे तसेच आपल्या भावी पिढीला यांचे अवलोकन करता यावे तसेच आपली संतांची भूमी आहे आणि ते मी जपण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्या कोकनात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो ' भक्तीरसातुन जनमाणसा नंतर नतमस्तक म्हणजे भजन 'भ - भजावा ज - जपावा आणि न - नमावा म्हणजे भजन होय. कोणतेही भजनी बुवा बारचे प्रतिस्पर्धक तरी संपुष्टात आणायचे ते चांगले मित्रांचे आदर करतात. आम्हाला खात्री आहे की हा लेख मनोरंजन भजनानंद रचून मंत्रमुग्ध कारणी भजने आणि खजीना आसणारी डबलबारी भजने आपल्याला आनंद होईल. या बद्दल आम्हाला सुद्धा खूप आनंद होते कि तुम्ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणत प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला जर तुमची कोणती कविता किंवा गवळण नेट वर टाकायची असेल तर नक्की कंमेकॅन्ट मध्ये सांगू शकता.
Post a Comment