कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको

 कृष्णा तुला मी ताकीद करते

 कृष्णा तुला मी ताकीद करते ।
घरी कुणाच्या जाऊ नको॥धृ॥
गवळ्या घरी बोभाट उठला ।
माठ दह्याचे फोडु नको॥१॥

रागीट तुझा पिता नंद ।
मार त्याचा खाऊ नको॥२॥

आली गवळण कपटी राधा ।
तिच्या संगे तु जाऊ नको॥३॥

पाळण्यात घालून झोके देते ।
आता मुळी तु रडू नको रे ॥४॥

वरद वाकुडया पेंद्या सुदामा ।
त्याच्या डावा मध्ये खेळु नको॥५॥

नामा म्हणे पतित पावना ।
त्याच्या नामा तु विसरू नको ॥६॥


 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||

No comments

Powered by Blogger.