dhyaneshwar Maharaj_अभंग
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळा ।।
काय मोकलीले वनी । सावजांनी वेढीले ।।
एथवरी होता संग । अंगे अंग लपविले ।।
तुका म्हणे पाहिले मागे । एवढ्या वेगे अंतरला ।।
कैलासाचा वास अधिक सिद्धबेट | विष्णूचें वैकुंठ पुरातन ||१||
भूमीवरी पंढरी तैसी आळंकापुरी | पंच कोशावरी पुण्यभूमी ||२||
सुखाची हे मूर्ति नीलकंठलिंग | चक्रतीर्थ सांग मोक्ष भेटे ||३||
परमार्थ सुअर्थ देखतांची संत | सांगितली मात अनुभवाची ||४||
नामा म्हणे देवा हें स्थळ चांगलें | चित्त मन रंगलें ज्ञानोबाचें ||५||
उदंड पाहिले उदंड ऐकिले | उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ||
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर | ऐसा विटेवर देव कोठे ||
ऐसे संतजन ऐसे हरिदास | ऐसा नामघोष सांगा कोठे ||
।। जय जय विठ्ठले। विठ्ठले विठ्ठले रखुमाई। श्री हरि विठ्ठले विठ्ठले ।।
आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा
|| धन्यवाद ||
Post a Comment