साडी तुझी नवी कोरी मी मारू कशी पिचकारी
गवल्याच्या पोरी तुझे लाड झाले भारी
नको आलं घेऊ माज्यावरी
साडी तुझी नवी कोरी मी मारू कशी पिचकारी || धृ ||
जातेस माटरी कामी घेऊन सांगे कान्हा गेला दही खाऊन
नरी ग ग नरी ग ग
करते लबाडी खोटे बोलुनी, सांगते चहाडी घरी जाऊनीं
नरी ग ग नरी ग ग
उगाच माजी करते बदनामी, उगाच माजी करते बदनामी
अगं जाऊन तू दारो दारी - अगं जाऊन तू दारो दारी ।। १ ।।
सरळ साधा मी दिसतो ग भोळा, मला म्हणती कृष्ण सावळा
नरी ग ग नरी ग ग
माज्या संगे गोपाळांचा मेळा, मी ग तोडियेले त्या उखळा
नरी ग ग नरी ग ग
करू नको तू उगा दांडगाई, करू नको तू उगा दांडगाई
मी गोकुळ चा ग हरी - मी गोकुळ चा ग हरी ।। २ ।।
हेरा घारा घालून ग बाई, अक्का दमला मजा जीव
नरी ग ग नरी ग ग
शिंके तोडून जाती दुसरे, पण येते माझे नाव
नरी ग ग नरी ग ग
मुकेश सांगे या कवनातून,
भोळा मजा कृष्ण मुरारी - भोळा मजा कृष्ण मुरारी ।। ३ ।।
गवल्याच्या पोरी तुझे लाड झाले भारी
नको आलं घेऊ माज्यावरी
साडी तुझी नवी कोरी मी मारू कशी पिचकारी
या गवळणीची चाल समजून घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता
Post a Comment