वाट चुकलो स्वामीराया
vat chukalo swami raya
गायक बुवा समिर रामा कदम आणि त्यांचे भजनी मंडळ श्री लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पोखरण यांनी खूप सुंदर चाल लावून हे भजन खूप सुंदर स्वरूपात सादर केले आहे.
षड्रीपुंची झाली बाधा, जग सारे मोहमाया
वाट चुकलो स्वामीराया, हात द्या सावराया || धृ ||
गुंतलो या मायाजाळी, मोहात मी अडकलो
पातकी हा देह माझा, स्वामी नाम विसरलो
झाली मज उपरती, अवघा जन्म गेला वाया
वाट चुकलो स्वामीराया, हात द्या सावराया || 1 ||
धूप दिप कापूराची, सुटली संगत टाळाची
भाव मनी उरला नाही, नाही ओढ भजनाची
होती गाठीशी पुण्याई, सावरलो जाता वाया
वाट चुकलो स्वामीराया, हात द्या सावराया || 2 ||
आता न सुटो हात तुमचा, श्री स्वामी समर्था
आलो शरण चरणाशी, जन्म होऊ दे हा गाथा
नको दूर लोटू आता, करा लेकरावर माया
वाट चुकलो स्वामीराया, हात द्या सावराया || 3 ||
गीत : जयंत रेवडेकर
संगीत/गायन : बुवा समिर रामा कदम
श्री लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पोखरण
गुरुवर्य : कै. काशिराम परब बुवा व श्री. सुशिल गोठणकर बुवा
पखवाज/ढोलकी : ओंकार दुखंडे
तबला : आकाश सावंत
चकवी : दिनेश नाईक
टाळ : दत्तात्रय मांडवकर
कोरस :श्रीकांत कदम ,रुपेश पुजारे,शुभम देसाई,बुवा विशाल सावंत,अक्षय महाडीक
सौजन्य : श्री. जितेंद्र खेडेकर,श्री. अनिल आस्वलकर,श्री. बाबु हडकर
सहकार्य: श्री. वसंत बाणे,
रेकॉर्डींग:बाईत स्टुडीओ, भांडुप
Post a Comment