सत्य परिस्थितीचे कथन करणारा अतिशय भावनिक असा हृदयस्पर्शी अभंग आहे आणि त्याला
अजून सुंदर बनवण्यासाठी, गोड आवाजात गाणारे गायक श्री गणेशजी महाराज गोंडे यांनी हे
भजन अतिशय त्यांच्या सुंदर आवाजात म्हटले आहे.
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात ||
मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात || धृ ||
कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला |
कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला || 1 ||
कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी |
नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी || 2 ||
जिथे रंगतो मी देवा भक्तीच्या रंगात |
गंध फ़ुल नाही जवळी तुझ्या पूजनात || 3 ||
भक्ती भाव जाणून घे तू वसे जो उरात |
कर्मरूप सेवा तुझिया पदी वाहतो मी || 4 ||
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात | कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात ||
Post a Comment