घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण_Lyrics गौळण

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण_Lyrics गौळण


घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण अप्रतिम सादरीकरण सुप्रसिद्ध भजनकार बुवा श्री.ज्ञानदेव मेस्त्री यांचे पटशिष्य बुवा कु.संकेत मेस्त्री आणि त्यांचे भजनी मंडळ या गौळणी ची चाल समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करून पाहू शकता |


घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण
पायी वाजती रुमझुम पैंजण
ठुमकत ठुमकत चाले डोलत
ठुमकत ठुमकत चाले डौलत वाऱ्याच्या तोलाने  || धृ ||

हासत खुदुखुदू मोडीत डोळे
मनी आठवी कृष्णाचे चाळे
लगबगीने ती प्रभात काळी 
लगबगीने ती प्रभात काळी आली नंदाच्या अंगणी ।। १ ।।

वाट अडवी सारंगधर
सोडी कान्हा जाऊ दे लवकर
धरू नको पदराला कन्हैया
धरू नको पदराला कन्हैया उशीर जाहला मला ।। २ ।।

किती किती खोड्या करीसी हरी
जाईन लवलाही सांगेन यशोदा
बांधीन उखळासी मारीन मुसळाने
एका जनार्दनी एक जाणे नकळे या गौळणी ।। ३ ।।



या गवळणीची चाल समजून घेण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता

👇🏻

Link


आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 

|| धन्यवाद ||


    मित्रांनोसंतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवाअखंड टिकून राहावा  संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्नप्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहेआपल्या सर्वांच्या मागणीवरूनसंतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे तसेच आपल्या भावी पिढीला यांचे अवलोकन करता यावे तसेच आपली संतांची भूमी आहे आणि ते मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. 

आपल्या कोकनात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो ' भक्तीरसातुन जनमाणसा नंतर नतमस्तक म्हणजे भजन ' - भजावा   - जपावा आणि  - नमावा म्हणजे  भजन होयकोणतेही भजनी बुवा बारचे प्रतिस्पर्धक तरी संपुष्टात आणायचे ते चांगले मित्रांचे आदर करतातआम्हाला खात्री आहे की हा लेख  मनोरंजन भजनानंद रचून मंत्रमुग्ध कारणी भजने आणि खजीना आसणारी डबलबारी भजने आपल्याला आनंद होईलया बद्दल आम्हाला सुद्धा खूप आनंद होते कि तुम्ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणत प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे धन्यवादतुम्हाला जर तुमची कोणती कविता किंवा गवळण नेट वर टाकायची असेल तर नक्की कंमेकॅन्ट मध्ये सांगू शकता

1 comment

Lyrics Songs said...

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण_Lyrics गौळण khup chan ahe
please sarvanni nakki aaika

Powered by Blogger.