माझे अछडे बछडे छकुडे गं राधे रुपडे गं_ संत जनाबाईंची लडीवाळ गौळण
संत जनाबाईंची लडीवाळ गौळण
हरी माझा गे सावळा
पायी पैंजण वाजे खुळखुळा
याने भुलविल्या गोपीबाळा !
हरी माझा गे नेणता
करी त्रिभुवनाचा घोंगता
जो का नांदे त्रिभुवनी !
ऐसे देवाजीचे गडी
पेंद्या सुदामाची जोडी
बळीभद्र त्याचा गडी !
जनी म्हणे तू चक्रपाणी
खेळ खेळतो वृंदावनी
लुब्ध झाल्या त्या गवळणी !
Post a Comment