श्री गणपतीची भजने - २

श्री गणपतीची भजने -  


।। ।।

प्रथम नमूं गजवदनुं । गौरीहराचा नंदनु ।।

सकळ सुरवराचा वदनु। भूषकवाहनु नमियेला ।।१॥

म्हणवूनि सुरवरीं केली पूजा । त्रिभुवनीं आणिक नाहीं दुजा ।।

विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा । भावे भजा एकदंता ...।।२।।


।। ।।

नमो नमों तुज श्रीगणराया । बुध्दी द्यावी तुझें गुण गाया.. ।। धृ ।।

अंगी उटी शेंदुराची । कंठी शोभेमाळ मुक्ता फळांची ।

जयघोष बोला। मंगल मुर्ती मोरया... । । १ । ।

उमा महेश्वराचा असे तूं बाळ। भक्तांचा कैवारी दुष्टांचा काळ ।

तुमची असू दयावी । आम्हांवरी छाया..।।२।।

प्रतिवर्षी घरोघरी पूजन चाले । जिकडे पहावे तिकडे भक्त आनंदाने डोले ।

 जयघोष बोला। गणपती बाप्पा मोरया.. ।। ३ ।

विठ्ठलनाथाची असे विनवणी । कृपा असू दयावी पूर्ण करीतो मी लेखणी । 

बाळ आदिनाथ । लागे तुमच्या पाया..।।४।।


।। ।।

गणराया गणराया गणरायातू  हे गणनाथा

तु सुखकारक, तु दुःखहारक। भक्तांच्या मोरया।।धृ।। 

सकल कलांचा तू अधिनायक । देई विद्या देई आम्हां वर । 

चराचराला व्यापून उरशी । गणनायक प्रभूवरा ।। १ ।। 

सिंदूरचर्चित कांती शोभे। मुखीं नाम शोभे गणरायाचे । 

भावमनीचे जाणूनी देवा । तोडी भवबंधना ।। २ ।।

 आदिब्रम्ह तू निर्गुण ईश्वर। ओमकारा तूं तूं विघ्नेश्वर । 

जन्मोजन्मी तुझीच सेवा । व्हावी मज भजनी ।। ३ ।।


।। ।।

तुझ्या कृपेने दिन उगवे हा । करुनी तव भजना । वंदितो तुजला गजवदना ... । । धृ ।। 

सिंदुरवदना तुजला नमितो । दर्शन दे मजला । 

सुखकर्ता तू दुःख हरोनिया। तारी प्रभो सकलां। 

विघ्नविनाशक म्हणती तुजला । तूं अमुची प्रेरणा ।। १ ।।

 सर्व सुखाचा तू प्रभूदाता। विदयेच्या देवा । 

जनजीवनी या तूच शुभकरा। शुभदिन फुलवावा। 

कर्पूरगौरा गणनायक तूं । गाऊनीं तव कवना ।। २ ।।


।। ५ ।।

गणरायाला पहिले वंदन। प्रसन्न व्हावे हो शिवनंदन । । धृ ।। 

कांचनमय हा मुकुट शोभतो। रत्नहार हा कंठी रुळतो। 

रुंदकटीवर सर्प डोलतो। विलेपिले त्या भाळी चंदन ।। १ ।।

 विघ्नहराया भक्तांसाठी। सदा असावे अमुच्या पाठी। 

रसिक जनांची व्हावी दाटी। हिच प्रार्थना तवशिवनंदन ।। २ ।।


।। ६ ।।

तूं सुखकर्ता, तूं दुःखहर्ता । विघ्नविनाशक मोरया । 

संकटी रक्षी शरण तुला मी । गणपती बाप्पा मोरया..

मंगलमूर्ती मोरया । गणपती बाप्पा मोरया ।।धृ।।

मंगलमूर्ती तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिध्दिविनायक । 

तुझिया व्दारे आज पातलो। ये इच्छित मज द्याया ।। १ ।। 

तूं सकलांचा भाग्यविधाता। तूं विदयेचा स्वामीदाता । 

ज्ञानदीप उजळूनी आमूच्या । निमवी नैराश्याला । । २ ।। 

तूं माता तूं पिता जगी या । ज्ञाता तूं सर्वस्वी जगी या । 

पामर मी स्वर उणे भासती । तुझी आरती गाया।।३।।


।। ७ ।।

तूं सुखकर्ता तूं दुःखहर्ता । तूच कर्ता आणि करविता ।। धृ ।। 

ओंकारा तूं तूं अधिनायक । चिंतामणी तूं सिध्दिविनायक । 

मंगलमूर्ती तूं भवतारक। सर्वसाक्षी तूं अष्टविनायक ।

 तुझ्या कृपेचा हात मस्तकी । पायी तव मम् चिंता ।। १ ।। 

देवा सरु दे माझे मीपण । कृतार्थ होवों उजळो जीवन ।

 नित्य स्मरावे तुझेच दर्शन । तुझ्या धुळीचे व्हावे पूजन। 

सदैव राहो ओठावरती । तुझीच रे गुण गाथा ।। २ ।।


।। ।।

ओम नमों गणराज गजानन ... ।। धृ ।।

रुम झुम टाळ चालें, लपलप तोंड हालें । नाचत येई येई अंगणा ...... ।। १ ।।

हंसावरी शारदा खांदया झळकतो विणा । खेळत येई येई अंगणा ।।२।।

साहीशास्त्रांमध्ये गणपती शिरोमणी। महादेवदास लागे चरणी ।। ३ ।।


।। ।।

लंबोदर गिरीजा नंदना देवा । पूर्ण करी मनोकामना देवा.... ।। धृ।। 

हे मन पावन तव पदी सेवन। बुद्धी दयावी गजानना देवा ।। १ ।। 

पायी घागुऱ्या वाजती रुणझुण । नाचत यावे गजानना देवा ।। २ ।। 

एका जनार्दनी विनवतो तुज । विद्या द्यावी गजानना देवा ।। ३ ।।


।। १० ।।

गजानना श्री गणराया। आधी वंदू तुज मोरया ।। 

मंगलमुर्ती श्री गणराया । आधी वंदू तुज मोरया ।। धृ।। 

सिंदुरचर्चित धवळे अंग । चंदन उटी खुलवी रंग ।। 

बघता मानस होते दंग। जीव जडला चरणी तुझिया, आधी ।। १ ।।

 गौरी तनया भालचंद्रा । देवा कृपेच्या तूं समुद्रा ।।

वरदविनायक करुणागारा। अवघी विघ्ने नेसी विलया, आधी ।। २ ।।


।। जय जय रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।।



 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||


No comments

Powered by Blogger.