प्रार्थना & नमन

प्रार्थना & नमन


।। १ ।।

अलंकापुरी पुण्य भुमी पवित्र । तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ।

तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्रीसद्गुरु ज्ञानेश्वरांशी । ।



।। २ ।।

ओम नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ।

देवा तुचि गणेशु । सकलार्थ मतिप्रकाशु ।

म्हणे श्री निवृत्तीदासु। अवधारी जो जी।।


।। ३ ।।

मोरया मोरया मी बाळ तान्हें। तुझीच सेवा करुं काय जाणें । 

अन्याय माझे कोट्यान कोटी। मोरेश्वरा बां तु घाल पोटी।।



।। ४ ।।

मोरया मोरया बां एकदंता । विघ्नें हरती तुझे गुण गाता।

 भजनी पुजनी नाम तुझे घेता। कार्यसिध्दी होते प्रथम वंदिता । 

अपराध माझे कोट्यानकोटी। मोरेंश्वरा बां तुं घाल पोटी।।


।। ५ ।।

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ ।

निर्विघ्नं कुरु में देवोः सर्वकार्येषु सर्वदा ।।


।। ६ ।।

गणाधिश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। 

नमु शारदा मूळ चत्वारखाचा। गमोपंत आनंत या राघवाचा।।


।। ७ ।।

नमो नमो गणपती। नमो सरस्वती। नमो नमो रमापति। दीनबंधू ।

 नमन तुमचें तुम्हीं केलें । नमन सहजा सहज झालें ।

 नेणें काय आलें गेलें । सद्गुरुनाथा ।।


।। ।।

नमो गणपती गजानना। नमो सरस्वती मंगल ध्यान । 

नमो अगाध ब्रम्हपरायणा। नमो नमो स्वामीराय।।


।। ।।

कैलास राणा शिवचंद्र मोळी। फणिंद्र माथा मुकुटी झळाळी । 

कारुण्य सिंधु बहू दुःख हारी। तुजविण शंभो मज कोण तारी ।।



।। १० ।।

जटा विभुती उटी चंदनाची। कपाल माला प्रिय गौतमीची ।

 पंचानना विश्व निवांतकारी । तुजविण शंभो मज कोण तारी ।।



।। ११ ।।

ज्याच्या कृपेचा मज लाभ झाला। योगी अंतरीचा गुरुराज आला।

 गुरुदत्त ऐसा मज बोध केला। विसरुं कसा मी गुरु पादुकाला ।।



।। १२ ।।

देवा मजला गर्व नसावा। असेल तरी तो दूर गाल व्हावा । 

निंदा माझ्या मुखी नसावी। असेल तरी ती भंगुनी जावी।।


।। १३ ।।

वसुदेवं सुतंम् देवम्, कंस चाणूरमर्दनम्।

देवकी परमानंदनम्, कृष्णाम् वंदे जगद्गुरु ।।

 

।। १४ ।।

पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरण संतांचिया ।। १ ।।

त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारुं। बाबाजी सद्गुरुदास तुका । । २ । ।


।। १५ ।।

ओमकाराला वंदन करुनिं। हरि भजनी रंगू या ।। 

सप्तसुरातून भाव भक्तीनें । भाव फुले वाहूं या ।। 

दोन हस्तक एक मस्तक। जोडूनी विनम्र त्या होऊं या ।। 

सप्तसुरातून भाव भक्तीनें । भाव फुले वाहूं या ।। 

सत्कार्याशी देह झिजावा। हिच तुम्हां प्रार्थना ।।

सप्तसुरातून भाव भक्तीनें । भावफुले वाहूं या ।।


।। १६ ।।

ॐ नमो सद्गुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा । 

बैसोनि माझिया रसना । हरिगुण वर्णवीं । । १ । । 

हरिगुण विशाल पावन । वदवीं तूं कृपा करुन ।

मी मूढमति दीन । म्हणोनी कींव भाकितसें ।। २ ।।

 तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । 

एका वंदितसे चरण । सद्गुरुंचे आदरें ।। ३ ।।


।। १७ ।।

सप्रेमें करितां भजन । तेणें घडती कोटी यज्ञ ।।१ ॥ 

प्रेम सार प्रेम सार। वायां भार कुंथेचा ।। २ ।। 

प्रेमें विण न भेटे देवो। अवघा वावो पसारा ।। ३ ।। 

एका जनार्दनीं प्रेम सार। तुटे येरझार येणें जाणें ।।४।।


।। १८ ।।

काया वाचा आणि मन। एक करुनी करी भजन ।। १ ॥ 

हाचि मुख्य भजनी भावो। सांडी भेद अभेदाचा ठावो।। २ ।।

 मना धरुनिया शांती। प्रेमे भजे कमळापती ।।३।। 

एका जनार्दनी भजन । तेणें पावसीं समाधान ।।४।।


।। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल । श्रीज्ञानदेव तुकाराम ।। पंढरीनाथ महाराज की जय ।।


 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||



No comments

Powered by Blogger.