भजन
।। १ ।।
हरि जय जय राम
कृष्ण हरि । । धृ ।।
राजाराम रामकृष्ण
हरि । तुझ्या नामाचा लागो छंद। श्रीकृष्ण गोविंद ।
मुकुंद मुरारी राधेश्याम, श्याम श्याम, हरि ।।१ ॥
पतित तु पावना। हे जगत्रयज्जीवना। आलो शरण तुला । दे अभय मला।
रघुनंदन राधेश्याम, श्याम श्याम, हरि ।। २ ।।
।। २ ।।
रामकृष्ण हरि जय जय राम । हरि जय जय राम ।।धृ।।
रघुपती राघव राजाराम। रघुपती राघव राजाराम।
रघुपती राघव राजाराम। पतित पावन सीताराम।। १ ।।
मोर मुकुट पितांबर शोभे। जानकी जीवन जय जय राम ।
पतित पावन सीताराम। जानकी जीवन जय जय राम ।। २ ।।
।। ३ ।।
ओम नमो ज्ञानेश्वरा । करुणा करा दयाळा ।।धृ।।
तुमचा अनुग्रहा लाधलो। पावन झालो चराचरी ।।१।।
मी कलाकुसरी काहीच नेणें । बोलतो वचनें अंतिभाविका । । २ । ।
एका जनार्दनीं तुमचा दास। त्याची आस पुरवावी ।। ३ ।।
।। ४ ।।
ओम हरि नारायणा
हरि नारायणा ।
नारायणा केशवा
माधवां, ओम।। धृ ।।
नेत्र शिणले तुझ्या दर्शना । धावत येरे मन मोहना, ओम । । १ । ।
हरि भजनाची आवड मोठी। धावत आलो भजनासाठी, ओम।।२।।
।।
५ ।।
हरि जय जय राम
। हरि जय जय राम जय जय रामकृष्ण हरि ।।
हरि राजाराम । हरि राजाराम । राजाराम कृष्ण हरि ।। १ ।।
सावळें राम। रामकृष्ण हरि। गोवर्धन गिरीधारी मुरारी।।
हरि राजाराम। हरि राजाराम। राजाराम कृष्ण हरि ।।२।।
।।
६ ।।
भगवा झेंडा
फडकत आला आला - २ ।
जय जय रामकृष्ण
रामकृष्ण बोला।।धृ।।
अयोध्येचा राम राजा झाला। पितृवचनासाठी वनवास भोगियेला... । । १ । ।
गोकुळात कृष्ण जन्म झाला । कंस मामाचा हो वध त्याने केला .. ।। २ ।।
जिजाईच्या पोटी शिव जन्मला। हिंदवी स्वराज्य त्याने स्थापन हो केला ।। ३ ।।
।।
७ ।।
सारंगा SSS सारंगा SSS
जय जय रामकृष्ण रामकृष्ण । गा गा गा ।।धृ।।
मधुबंशीला घेऊनी संगे । रामकृष्ण रामकृष्ण गा गा गा । । १ । ।
भिमपलासची करुनी संगत। हरि भजनाला येई रंगत... ।। २ ।।
।। जय जय विठोबा रखुमाई। जय जय विठोबा रखुमाई ।।
Post a Comment