श्री दत्ताची भजने

 श्री दत्ताची भजने


।। ।।

नमन माझे गुरुराया। महाराजा दत्तात्रया । । १ । ।

तुझी अवधुत मूर्ती। माझ्या जिवीची विश्रांती ।। २ ।।

 माझ्या जिवीचे साकडे । कोण निवारील माझे कोडे ।।२।।

 अहो अनुसुया सूता । तुका म्हणे पावे आतां ।। ३ ।।


।। ।।

त्रिगुणात्मक त्रैमूर्ति वेगळा । पाहे तो सांवळा दत्तरावो।। १ ।। 

मन माझें वेधलें दत्ताचे चरणीं । नाहीं आन मनीं दुजा छंद ।। २ ।। 

परात्पर पहावा ह्रदयी तैसा घ्यावा । एका जनार्दनी सांठवावा दत्त मनीं ।। ३


।। ।।

विनशिक्त दत्त घ्यावा दत्त गावा। दत्त आमुचा विसावा । । १ । ।

दत्त अंतर्बाह्य आहे। दत्तविणा कांही नोहे ।। २ ।।

दत्त जनी दत्त वनी। दत्तरुप हे अवनी ।। ३ ।। 

दत्तरुपी लीन वृत्ती । एका जनार्दनीं विश्रांती ।।४।।


।। ।।

प्राणियासी मंत्र सोपा । दत्त दत्त वाचे जपा ।।१ ॥ 

आणिक न लगे साधन । दत्तनामें घडे ज्ञान ।। २ ॥ 

न लगे योगयाग पाही । दत्तावांचून नेणे काही।। ३ ।। 

एका जनार्दनी वेधलें मन । मनचि जालें उन्मन ।।४।।


।। ॐ श्री गुरुदेव दत्त ।।



 आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा 
|| धन्यवाद ||


No comments

Powered by Blogger.